महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'10 च्या तुलनेत 19 ही लहान संख्या, हे मला माहितच नव्हते', चिदंबरम यांनी उडवली भाजपची खिल्ली - बिहार विधानसभा निवडणूक अपडेट

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी जाहीरनाम्यावरून भाजपवर टीका केली. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोफत कोरोना लस आणि 19 लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले.

चिदंबरम
चिदंबरम

By

Published : Oct 23, 2020, 10:23 PM IST

नवी दिल्ली -बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरून भाजपने टीका केली होती. गुरुवारी भाजपने आपला जाहीरनामा जारी करत, 19 लाख नोकऱ्या आणि कोरोना लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी टीका केली आहे.

लाख नोकऱ्या देणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या जाहीरनाम्यावर टीका केल्यानंतर एनडीएने 19 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. 10 च्या तुलनेत 19 ही लहान संख्या आहे, हे मला माहित नव्हते. मी पुन्हा प्राथमिक विद्यालयात जाऊन शिक्षण घ्यायला हवे, असे टि्वट चिंदबरम यांनी केले आहे.

देशभरात कोरोनाचा प्रसार झाला असतानाही बिहार विधासनभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस आणि 19 लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मोफत कोरोना लस देण्याच्या भाजपाच्या आश्वासनावर टीका झाली. बिहारमधील विधानसभा निवडणूक हरण्याची भाजपाला भीती वाटत आहे. त्यामुळेच ते इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत, या शब्दात काँग्रेसने टीका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details