नवी दिल्ली - संसदेत पावसाळी अधिवेशानदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आपचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना दिवे लावायला आणि थाळ्या वाजवायला लावल्यावरून टीका केली. जर अशा गोष्टी केल्याने कोरोना नष्ट होणार असेल, तर आम्हीही मोदींसोबत टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यास तयार आहोत, असे संजय सिंह म्हणाले. यावर भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी 'चरखा चालवल्यामुळे इंग्रज भारत सोडून गेले होते का?' असा सवाल केला.
चरख्याने इंग्रजाना देश सोडून जाण्यास भाग पाडले का? - सुधांशु त्रिवेदी यांची संजय सिंहवर टीका
चरखा चालवल्यामुळे इंग्रज भारत सोडून गेले होते का?, ते एक लोकांचे मनोबल वाढवण्यासाठीचे प्रतिक होते. स्वतंत्रता संग्रामच्यावेळीही अशा गोष्टी करण्यात आल्या होत्या, असे भाजप नेते सुधांशु त्रिवेदी म्हणाले.
कोरोना विषाणून आतापर्यंतचे सर्वांत मोठे संकट आहे. थाळ्या वाजल्यामुळे कोरोना नष्ट होईल का, असे प्रश्न लोक विचारत आहेत. चरखा चालवल्यामुळे इंग्रज भारत सोडून गेले होते का? चरखा हे एक लोकांचे मनोबल वाढवण्यासाठीचे प्रतिक होते. स्वतंत्रता संग्रामच्यावेळीही अशा गोष्टी करण्यात आल्या होत्या. तसेच थाळ्या वाजवणे हे एक कोरोनाविरोधातील लढाईचे एक प्रतिक होते. ज्यामुळे लोकांचे मनोबल वाढले, असे ते म्हणाले.
संसदेत चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. युवा नेत्याने दावा केलाय की, त्यांनी फेब्रुवरीमध्ये कोरोना संकटाबाबत टि्वट केले होते. तसेच केंद्र सरकारच्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमावेळी विमानतळ बंद न केल्यावरून टीका केली होती. मात्र, हेच युवा नेते विदेशात बसून टि्वट करत होते. त्यांनी संसदेत यावर चर्चा नाही केली, असे ते म्हणाले.