नवी दिल्ली - विमान कंपन्यांनी तिकीट विक्री करताना अशा प्रकारे करावी, की जेणेकरून मधल्या रांगेतील आसने ही रिकामी राहतील. नागरी उड्डाण संचलनालयाने विमान कंपन्यांना हे आदेश दिले आहेत. विमान प्रवासात दोन प्रवाशांदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग पाळता यावे यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रवाशांच्या जास्त संख्येमुळे जर कोणा प्रवाशाला मधले आसन देण्यात आले असेल, तर त्याला स्व-सुरक्षेसाठी काही साधने पुरवण्यात यावीत असेही संचलनालयाने स्पष्ट केले आहे. यामध्ये रॅप-अराऊंड गाऊन, तीन स्तरांचे फेस शील्ड या साधनांचा समावेश आहे.