पुरी- हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र पुरी येथे जगन्नाथ रथ यात्रेचा महोत्सव सुरू आहे. ओडिशा राज्यात होणाऱ्या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. जवळपास एक आठवडा चालणाऱ्या महोत्सवाला भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. महाराष्ट्रातूनही गेल्या ११ वर्षापासून एक कलाकार कुटुंबीय महोत्सवाला हजेरी लावत आहे.
गेल्या ११ वर्षापासून कोल्हापूरच्या कलाकारांची जगन्नाथ रथयात्रेत सेवा - रथ
एक आठवडा चालणाऱ्या जगन्नाथ यात्रेला भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. महाराष्ट्रातूनही गेल्या ११ वर्षापासून एक कलाकार कुटुंबीय महोत्सवाला हजेरी लावत आहे.
आम्ही कोल्हापूर, महाराष्ट्र येथून आलो आहे. मी गेल्या ११ वर्षापासून येत आहे. मी माझ्या पत्नीसह आलो आहे. आम्हाला जगन्नाथची सेवा करायची आहे. येथे जगन्नाथची प्रत्यक्ष सेवा करायला मिळत असल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. जगन्नाथांसमोर काढण्यात येत असलेल्या रांगोळ्यांप्रमाणे महाराष्ट्रातही रांगोळी काढण्याची परंपरा आहे. हीच परंपरा आम्ही येथे सादर करत आहोत. यासाठी माझी पत्नी मला मदत करते. आम्ही येथे सादर केलेली कलासेवा सर्वांना आवडत आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर येथून आलेल्या कलाकाराने दिली आहे.
देवासमोर आमची कला सादर करुन आम्हांला खूप आनंद होत आहे. सर्वांनी मनापासून देवासाठी काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातून जगन्नाथ येथील महोत्सवाला गेलेल्या भाविकांनी दिली आहे.