महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देवेंद्र फडणवीसच होतील दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, भाजपच्या राम कदमांचे सूचक वक्तव्य - shivsena

'आमची भाजपशी ‘युती’ जरूर आहे. पण, शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल,' असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले होते.

राम कदम

By

Published : Jun 20, 2019, 5:18 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनावा, यासाठी कंबर कसली असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील, असे म्हटले आहे. त्यांना सर्वांचा पाठिंबा मिळेल, असे सूचक वक्तव्यही यांनी केले आहे.

'देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून चहूबाजूंनी कौतुक होत आहे. सर्वांच्या पाठिंब्याने तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील. शिवसेना तर आमचा मित्रपक्ष आहे. त्याशिवाय, विरोधी पक्षांचेही फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री बनावेत, असेच मत आहे,' असे कदम यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने त्यांच्या 'सामना' या मुखपत्रातून पुढील विधानसभेच्या कार्यकाळात आपला मुख्यमंत्री होईल, असे संकेत दिले होते. यावरून काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनावा, यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले होते.

'आमची भाजपशी ‘युती’ जरूर आहे. पण, शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल,' असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले होते.

बुधवारी शिवसेनेचा ५३वा वर्धापनदिन साजरा झाला. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही पक्षांचे इतर नेते उपस्थित होते. या वेळी, आमचे ठरले असून सगळे समसमान असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details