अमरावती -दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील १३ गावचे गावकरी एक विशेष उत्सव साजरा करतात. पारंपरिक देवरगट्टू लाठीयुद्ध उत्सव, ज्यामध्ये या तेरा गावातील लोक वेगवेगळे गट करुन एकमेकांशी लाठीयुद्ध खेळतात. दरवर्षी हा रक्तरंजित असा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.
जिल्ह्यातील होळगुंडा मंडळाच्या देवेरगुट्टा येथे हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला 'बन्नी फेस्टीवल' देखील म्हणतात. श्री मल्लेश्वरी स्वामी आणि श्री मलम्मा यांच्या मूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान विविध गावांमधील लोकांचे गट एकमेकांरह लाठीयुद्ध खेळतात. केवळ आंध्राच नाही, तर तेलंगाणा आणि कर्नाटकामधील भक्तही दरवर्षी या उत्सवामध्ये सहभागी होतात.