महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पानिपत चित्रपटावर बंदी आणा, नाहीतर कायदा सुव्यवस्था धोक्यात' - पानिपत चित्रपट

हरियाणा, राजस्थान आणि उत्तर भारतातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता, चित्रपटावर बंदी आणावी नाहीतर कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पानिपत चित्रपटामध्ये ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करण्यात आली आहे, असे विश्वेंद्र सिंह यांनी म्हटले.

विश्वेंद्र सिंह
विश्वेंद्र सिंह

By

Published : Dec 8, 2019, 7:50 PM IST

नवी दिल्ली - मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या पानिपतच्या लढाईवरील चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तत्कालीन भरतपूर साम्राज्याचे महाराज सुरज मल यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं दाखवली असल्याचे महाराजांचे चौदावे वंशज विश्वेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

सुरज मल यांचे चौदावे वंशज विश्वेंद्र सिंह पानिपत चित्रपटाबद्दल बोलताना

हरियाणा, राजस्थान आणि उत्तर भारतातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता, चित्रपटावर बंदी आणावी नाहीतर कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पानिपत चित्रपटामध्ये ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करण्यात आली आहे, असे विश्वेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

वास्तविक: जेव्हा मराठा आणि पेशवा पानिपतच्या युद्धात पराभव पत्करुन माघारी येत होते, तेव्हा महाराजा सुरज मल आणि राणी किशोरी यांनी मराठ्यांना ६ महिने आश्रय दिला होता. त्यावेळी खंडेराव होळकर यांचा मृत्यूही भरतपूर साम्राज्याची राजधानी कुम्हेरमध्ये झाला होती. आजही गागरसोली गावामध्ये त्यांची समाधी आहे, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही महापुरुषांवर चित्रपट बनवायचा असेल, तर त्याआधी सरकारने एक समिती बनवावी. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महापुरुषांचे वंशज आणि त्या समाजाची परवानगी घेण्यात यावी, नंतरच चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details