नवी दिल्ली- भारत - चीन या दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका अधिक संख्येने हिंदी महासागरात (भारतीय समुद्र हद्दीत ) तैनात केल्या आहेत.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार हिंदी महासागरात तैनात करण्यात येणाऱ्या एकूण युद्धनौकेमध्ये आणखी 25%अतिरिक्त युद्धनौकांची वाढ करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शंभर दिवसांपासून भारतीय नौदलाने उत्तर लडाख ते मध्य मॉरिशियस पर्यंत जवळपास सात हजार किलोमीटर आणि पश्चिमेकडे लाल समुद्रापासून पूर्वेला मलक्का जलडमरु मध्य पर्यंत तब्बल आठ हजार किलोमीटर पर्यंतचे अंतर भारतीय युध्द नौकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
शत्रूला उत्तर देण्यास सज्ज
भारतीय नौदलाने भारताच्या समुद्र हद्दीत महत्त्वाच्या ठिकाणांवर आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. या कोणत्याही परिस्थितीत शत्रूला प्रत्युत्तर देण्यास तत्पर असतात या युद्धनौका बंगालची खाडी मलक्का जलडमरु मध्य, अंदमान सागर, दक्षिण आणि मध्य हिंदी महासागर, आदानची खाडी आणि फारसी खाडी या सागरी भागात भारतीय युध्द नौका गस्त घालताना दिसून येऊ शकतात.
सदैव सतर्क
भारतीय नौदलाचे एक जहाज 2019 मध्ये ऑपरेशन संकल्पसाठी फारशी खाडीत तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या फारशी खाडीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांना ही युध्द नौका सुरक्षा प्रदान करत आहे. भारतीय नौदलाचे या सागरी परिक्षेत्रात उत्तम प्रकारचे जाळे निर्माण झाले आहे. याशिवाय जहाजांवरील लढाऊ विमाने देखील या परिसराची टेहळणी करतात.
मुंबई हल्ल्यासारखी घटना होऊ नये म्हणून
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे भारतीय किनारपट्टी भागावर नौदलाची जहाजे नेहमीच सतर्क असतात, या भागात या जहाजांकडून सतत निगराणी केली जाते. 26 -11 च्या मुंबई हल्ल्यानंतर नौदलाने जवळपास 20 सरकारी संस्थासोबत सामंजस्य करार केला आहे. या मागील मुंबई हल्ल्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळणे हा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्व लडाखमध्ये चिनी सेनेच्या हालचाली वाढल्या आणि 15 जूनला गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले. त्यानंतर भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल या तिन्ही प्रमुखांची दररोज बैठक आयोजित करण्यात आली. या संयुक्त बैठकीत सीमेवरील तणाव परिस्थितीबाबत संयुक्तपणे विचारविमर्श करण्यात आला. चीनच्या घुसखोरीनंतर भारतीय समुद्र हद्दीत नौसेनेच्या जहाजांनी सातत्याने निगराणी सुरू केली. तसेच जूनमध्ये ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या पारस्परिक सहयोग करारानुसार भारतीय नौसेनेच्या जहाजांना कोकोस आणि किल्लींग आयलँडपर्यंत पोहोचण्याची मुभा मिळाली. या सवलतीमुळे नौदलास हिंदी महासागर परिसरात प्रवेश करणाऱ्या चिनी युद्धनौकावर लक्ष ठेवणे सोपे झाले.