महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारच्या मंत्रिमंडळाचे नितीश कुमार यांच्याकडून खातेवाटप; गृह विभागाची भाजपकडून मागणी

नितीश कुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन, निवडणूक दक्षता आणि इतर वाटप न केलेल्या विभागांची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे. उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ, पर्यावरण आणि वन, व्यापारी कर, आपत्कालीन नियोजन आणि शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नितीश कुमार
नितीश कुमार

By

Published : Nov 17, 2020, 3:31 PM IST

पाटणा - नितीश कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना विविध विभागांचे वाटप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने नितीश कुमार यांच्याकडे गृह विभागाची मागणी केली आहे. असे असले तरी नितीश कुमार यांनी अद्याप गृह विभाग स्वत:कडेच ठेवले आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. २३ नोव्हेंबरपासून पाच दिवसीय अधिवेशन घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन, निवडणूक दक्षता आणि इतर वाटप न केलेल्या विभागांची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे. उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ, पर्यावरण आणि वन, व्यापारी कर, आपत्कालीन नियोजन आणि शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यंत्री रेणू देवी यांच्याकडे पंचायत राज, मागास विकास आणि ईबीसी कल्याण आणि उद्योग मंत्रालय देण्यात आली आहे.

विजय चौधरी यांच्याकडे ग्राम विकास विभाग, जलसंपदा, माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कार्य मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. विजेंद्र यादव यांच्याकडे उर्जा, योजना, अन्न आणि ग्राहक मंत्रालयाची जबाबदारी आहे. तर मेवा लाल चौधरी यांच्याकडे शिक्षण मंत्रालय देण्यात आले आहे.

ही आहे बिहारच्या मंत्रिमंडळाची यादी-

  1. नितीश कुमार -सामान्य प्रशासन, निवडणूक दक्षता, गृह
  2. उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद -अर्थ, पर्यावरण आणि वन, व्यापारी कर, आपत्कालीन नियोजन आणि शहर विकास मंत्रालय
  3. उपमुख्यंत्री रेणू देवी -पंचायत राज, मागास विकास आणि ईबीसी कल्याण आणि उद्योग मंत्रालय
  4. विजय चौधरी- ग्राम विकास विभाग, जलसंपदा, माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कार्य मंत्रालय
  5. विजेंद्र यादव - उर्जा, योजना, अन्न आणि ग्राहक मंत्रालय
  6. शीला कुमारी- परिवहन
  7. संतोष मांझी- सूक्ष्म सिंचन, मागास (एससी) / विशेष मागास प्रवर्ग (एसटी) कल्याण
  8. मुकेश सहनी- पशुपालन आणि मत्स्यपालन
  9. मंगल पांडे- आरोग्य, रस्ता, कला आणि संस्कृती
  10. अमरेन्द्र सिंह- कृषि, सहकार, ऊस
  11. राम प्रीत मंडल- सार्वजनिक बांधकाम
  12. जीवेश कुमार- पर्यटन, श्रम, खणन
  13. राम सूरत- महसूल, कायदा

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा घेतली शपथ-

नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात सोमवारी पार पडला. यावेळी राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत नियमांचे पालन करण्यात आले.

कोणाला किती जागा -

तीन टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा 10 नोव्हेंबरला निकाल समोर आला. 243 मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या आहेत. तर यूपीएला 110 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएत भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला.

ABOUT THE AUTHOR

...view details