रांची -चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यानंतर सोशल मीडियावर धोनीला अनेक धमक्या देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर झारखंडमधील युवा क्रिकेटर सत्यम राय यांच्या नेतृत्वात शहरातील अल्बर्ट एक्का चौकात विरोध प्रदर्शन करण्यात आले. यासह आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांना अटक करत कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण -
कोलकाता नाइट रायडर्सने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना १० धावांच्या फरकाने चेन्नईला पराभव स्विकारावा लागला. यानंतर कर्णधार धोनीसह इतर फलदांजांना चाहत्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. यातच काहींनी तर धोनीसह त्याची पत्नी साक्षी आणि मुलीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या. या घटनेसंदर्भात सोशल मीडियावरच अनेक लोकांनी रोष व्यक्त केला आहे.