महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकमध्ये ईमानदार जनतेसह लोकशाही हरली - राहुल गांधी - Rahul Gandhi

कर्नाटकमध्ये स्वार्थी माणसाचा लोभ जिंकला. कर्नाटकच्या जनतेचा आणि लोकशाहीचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विट करुन दिली. कर्नाटकमध्ये काँग्रेस जेडीएसने सत्ता स्थापन केल्यापासून युती तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये आमदारांना लाच देण्याचे अमिष देण्यात आले. यामुळे कुमारस्वामींचे सरकार कोसळले. ही लोकशाही आणि कर्नाटकमधील ईमानदार जनतेची हार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

कर्नाटकमध्ये ईमानदार जनतेसह लोकशाही हरली - राहुल गांधी

By

Published : Jul 24, 2019, 5:06 AM IST

Updated : Jul 24, 2019, 5:16 AM IST

बंगळुरू- कर्नाटकमध्ये आलेल्या राजकीय भूकंपामध्ये कुमारस्वामींचे सरकार कोसळले. तेव्हा भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगभग सुरू केली. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे.

कर्नाटकमध्ये स्वार्थी माणसाचा लोभ जिंकला. कर्नाटकच्या जनतेचा आणि लोकशाहीचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विट करुन दिली. कर्नाटकमध्ये काँग्रेस जेडीएसने सत्ता स्थापन केल्यापासून युती तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये आमदारांना लाच देण्याची अमिषे देण्यात आली. यामुळे कुमारस्वामींचे सरकार कोसळले. ही लोकशाही आणि कर्नाटकमधील ईमानदार जनतेची हार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, विधानसभेच्या बहुमत ठरावामध्ये कुमारस्वामी बहुमत सिध्द करण्यात अपयशी ठरले. या ठरावात कुमारस्वामींना 99 मते तर भारतीय जनता पक्षाला 105 मते पडली. यामुळे कर्नाटकात मागील 14 महिन्यात स्थापन झालेली कुमारस्वामींची सरकार कोसळले.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून येडीयुरप्पा पुढील 2 दिवसात राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी दावा करतील. गुरुवार अथवा शुक्रवारी येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे समजते.

Last Updated : Jul 24, 2019, 5:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details