भोपाळ- मध्य प्रदेशातील निमाडच्या आदिवासीबहुल भागात आढळणारा कडकनाथ कोंबडा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात पूरक ठरतो, असे दिसून आले आहे. कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत आणि त्यामुळेच कडकनाथ कोंबडा/कोंबडी चिकनची मागणी देखील वाढली आहे.
मध्य प्रदेशचा कडकनाथ कोंबडा रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याबरोबरच कमी चरबीसाठी प्रसिद्ध आहे. हे चिकन प्रथिनांनी समृद्ध आहे, हृदय-श्वासोच्छ्वासाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी त्याचा फायदा होतो. कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हे मुख्य लक्ष्य आहे. यामुळे या चिकनची मागणीही वाढली आहे आणि हे लक्षात घेता राज्य सरकारने त्याचे उत्पादन व विक्री वाढविण्यासाठी एक विशेष आराखडा तयार केला आहे. यामुळे कुक्कुटपालकांचे उत्पन्नही वाढेल. कडकनाथचे शरीर, पंख, पाय, रक्त, मांस सर्व काळे असते. कडकनाथ चिकन हे पशुधन आणि कुक्कुट विकास महामंडळाच्या अधिकृत विक्रेता चिकन पार्लरमध्ये उपलब्ध झाले आहे.
कुक्कुटपालनास चालना