नवी दिल्ली - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूने आता भारतातही आपले जाळे झपाट्याने विस्तारले आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद पडल्याने अनेक मजूर, कामगार मिळेल त्या साधनाद्वारे आपल्या घराकडे परतत आहेत. महाराष्ट्रातून झारखंडमध्ये आपल्या घरी निघालेल्या महिलेने बाळाला जन्म दिला आहे.
श्रमिक रेल्वेने झारखंडमध्ये पोहोचलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म - पलामू न्यूज
महाराष्ट्रातून झारखंडमध्ये श्रमिक रेल्वेने आपल्या घरी निघालेल्या महिलेने बाळाला जन्म दिला आहे.
महाराष्ट्रातून श्रमिक स्पेशल ट्रेनने झारखंडमधील डालटनगंजमध्ये पोहोचल्यानंतर महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या. अधिकाऱ्यांनी महिलेला पलामू वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि आई दोघेही स्वस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूपा देवी असे महिलेचे नाव आहे.
रविवारी पहाटे महाराष्ट्रातील पनवेल येथून सुमारे 1 हजार 600 प्रवासी श्रमीक रेल्वे गाडी पलामूमधील डालटनगंज रेल्वे स्थानकावर आली. या ट्रेनमध्ये राज्यातील 23 जिल्ह्यांतील कामगार होते. त्या सर्वांचे स्क्रीनिंग डाल्टनगंज रेल्वे स्टेशनवर करण्यात आले. सर्व कामगारांना होम क्वारंटाईनमध्ये रहाण्यास सांगितले आहे.