महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उद्या फाशी होणार! दिल्ली न्यायालयाने निर्भयाच्या दोषींची याचिका फेटाळली

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची याचिका दिल्ली पातियाळा न्यायालयाने फेटाळली आहे.

Delhi's Patiala House Court dismisses the plea stay on execution
Delhi's Patiala House Court dismisses the plea stay on execution

By

Published : Mar 19, 2020, 4:14 PM IST

नवी दिल्ली -निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची याचिका दिल्ली पातियाळा न्यायालयाने फेटाळली आहे. दोषींनी न्यायालयात फाशीवर स्थगिती आणण्यासाठी याचिका दाखल केली होती.

दरम्यान, आजच निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंगची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुन्हा घडला तेव्हा दिल्लीत नसल्याचा दावा मुकेशने केला होता. तसेच अल्पवयीन असल्याची फेरयाचिका दोषी पवन गुप्ताने केली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने त्याचीही याचिका फेटाळली. तर पवन आणि अक्षयने दुसऱ्यांदा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तोही राष्ट्रपतींनी फेटाळला आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. कायद्यातील सर्व पळवाटा संपल्यामुळे उद्या दोषींना फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात चौघांना फाशी देण्यात येणार आहे.

डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details