नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन आहे. दिल्लीतील ओखला भाजी-पाला बाजार खुला असून येथे नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिग पाळत मास्क लावून खरेदी केली.
लॉकडाऊनमध्ये दिल्लीतील ओखला बाजार सुरळीत सुरू; 'अशी' घेतली जाते खबरदारी - delhi olkhla market
भाजीपाला, फळे ह्या गोष्टी अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. यामुळे दिल्लीतील बाजार खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी नागरिकांसह विक्रेत्यांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनमध्ये दिल्लीतील ओखला बाजार सुरळीत सुरू; 'अशी' घेतली जाते खबरदारी
पोलिसांकडून बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलिसांनी कडक तपासणी केली जात आहे. शहर लॉकडाऊन असले तरी भाजीपाला आणि फळांची विक्री सुरू आहे.
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2 हजार 902 एवढी झाली आहे. यातील 2 हजार 650 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 183 जण पूर्णत: बरे झाले असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सुधारित आकडेवारी जाहीर केली.