महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा भारतीय मुस्लिमांशी संबंध नाही - शाही इमाम बुखारी

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी नागरिकत्व (सुधारणा) कायद्याचा भारतात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिमांशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच, एखाद्या बाबीविषयी निषेध करण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिला आहे. मात्र, सर्वांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

शाही इमाम बुखारी
शाही इमाम बुखारी

By

Published : Dec 19, 2019, 12:02 AM IST

नवी दिल्ली - जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी नागरिकत्व (सुधारणा) कायद्याचा भारतात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिमांशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच, एखाद्या बाबीविषयी निषेध करण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिला आहे. मात्र, सर्वांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

'निषेध करणे हा भारतीय नागरिकाचा हक्क आहे. त्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. पण निषेध करताना नियंत्रण ठेवणंही गरजेचं आहे. आपल्या भावना नियंत्रणात ठेवणे हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे', असे बुखारी यांनी म्हटले आहे. तसेच, सीएए हा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन (एनआरसी) सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना अद्याप तो कायदा झाला नसल्याची आठवण करुन दिली.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून धार्मिक छळाला कंटाळून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. त्यांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही, अशी तरतूद या नागरिकत्व (सुधारणा) कायद्यामध्ये करण्यात आली आहे.

'राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यात फरक आहे. नागरिकत्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीची फक्त घोषणा झाली आहे. तो अद्याप कायदा झालेला नाही. नागरिकत्व कायद्यांतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार नाही. याचा भारतात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिमांशी काही संबंध नाही,' असे इमाम बुखारी यांनी म्हटले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details