नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज बुधवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जैन यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक ताप वाढल्याने आणि शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्याने आरजीएसएसएच रुग्णालयात अॅडमिट झालो असून सर्वांना आरोग्याची माहिती देत राहील, असे ट्विट जैन यांनी केले होते.