महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वाती मालिवाल यांच्या उपोषणाचा आठवा दिवस, समर्थन देण्यास नागरिकांची गर्दी - स्वाती मालीवाल बातमी

महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ३ डिसेंबरपासून दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे.

swati maliwal
स्वाती मालीवाल

By

Published : Dec 10, 2019, 5:06 PM IST

नवी दिल्ली - महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ३ डिसेंबरपासून दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दिवसेंदिवस मालीवाल यांची प्रकृती खालावत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि पुरुष राजघाटवर गर्दी करत आहेत.

शरिरातील साखरेची पातळी खालावली

उपोषणाचा ८ वा दिवस असल्याने मालीवाल यांच्या शरिरातील साखरेची पातळी खालावली आहे. तसेच त्यांचे वजन ५ किलोपर्यंत कमी झाले आहे. तब्येत ढासळत असली तरी सरकारकडून त्यांना अद्याप कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात स्वाती मालीवाल

स्वाती मालीवाल देशातील सर्व मुलींसाठी एकट्या उभ्या राहिल्या आहेत. आताच्या काळात कोणी आपल्या लोकांसाठी उभं राहत नाही, तेथे स्वाती मालीवाल देशभरातील महिलांसाठी उभ्या राहिल्या, असे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिला करनजोत कौर यांनी सांगितले. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. त्यामुळे गुन्हे कमी होतील आणि गुन्हेगारांना धडा मिळेल, असे सुषमा नावाच्या महिलेने सांगितले.

महिलांचा सन्मान केल्यानं देश पुढे जाईल

जेव्हा महिलांचा सन्मान होईल तेव्हाच देश पुढे जाईल. महिलांवरील अत्याचाराने देश प्रगती करणार नाही, महिलांनाही समान अधिकार पाहिजे, असे पाठिंबा देण्यास आलेल्या पूजा नामक महिलेने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details