नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 हून अधिक जण जखमी झाले आहे आहेत. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचारग्रस्त भागात दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत बैठक घेतली. यात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असे सांगण्यात आले.