महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : अमित शाह यांनी सूत्रं हाती घेतली, तातडीने बैठक बोलावून घेतला आढावा - दिल्ली हिंसाचार

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) धरणे देणारे आंदोलक व कायद्याला समर्थन देणाऱ्या गटामध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह चार जण ठार झाले. दिल्लीतील स्थिती पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दिल्लीतील सुरक्षेचा यावेळी आढावा घेण्यात आला.

delhi violence foure dead including police constable and three persons : amit shah took command over delhi violence
दिल्ली हिंसाचार : अमित शाह यांनी सूत्रं हाती घेतली, तातडीने बैठक बोलावून घेतला आढावा

By

Published : Feb 25, 2020, 1:57 AM IST

Updated : Feb 25, 2020, 2:09 AM IST

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) धरणे देणारे आंदोलक व कायद्याला समर्थन देणाऱ्या गटामध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह चार जण ठार झाले. दिल्लीतील स्थिती पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दिल्लीतील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी उच्चस्तरावर नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. शाह यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तातडीची बैठक घेतली. या बैठकीला शाह यांच्यासह गृहसचिव ए. के. भल्ला, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नायब राज्यपाल अनिल बैजल आणि दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक हेही उपस्थित असल्याचं समजते. या बैठकीनंतर दिल्लीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय गृहसचिव ए. के. बल्ला यांनी सांगितलं.

शाह यांच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिल्लीत असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले. तसेच त्यांनी संवेदनशील ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्याच्या सूचना रेड्डी यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष आजची रात्र दिल्लीत आहेत. यामुळे दिल्लीची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत.

हेही वाचा -

दिल्ली गोळीबार; पोलीस कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू, तर डिसीपी गंभीर

हेही वाचा -

'ट्रम्प यांच्या दौऱ्याचा भारताला काही फायदा नाही'

Last Updated : Feb 25, 2020, 2:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details