महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार: आरोपी ताहिर हुसेनला ७ दिवसांची पोलीस कोठडी

दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेनला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. गुरुवारी अटक केल्यानंतर पोलीस ताहिर हुसेनची कसुन चौकशी करत आहेत.

By

Published : Mar 6, 2020, 6:54 PM IST

tahir hussain
ताहिर हुसेन

नवी दिल्ली- दिल्ली हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेला 'आप'चा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनाला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कडकडडुमा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. गुरुवारी दिल्ली गुन्हे शाखेन ताहिर हुसेनला अटक केली होती. गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप ताहिर हुसेनवर आहे.

हेही वाचा -दिल्ली हिंसाचार: आपचा निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन अटकेत, आत्मसमर्पण स्वीकारण्यास न्यायालयाचा नकार

दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेनला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. गुरुवारी अटक केल्यानंतर पोलीस ताहिर हुसेनची कसुन चौकशी करत आहेत. ताहिर याच्या घरुन दगडांचा साठा, अ‌ॅसिड, पेट्रोल बॉम्बचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर ताहिर हुसेनवर ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -दिल्ली हिंसाचराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details