महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ३० वर; संवेदनशील भागातील परिस्थीती नियंत्रणात

ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून आज कोठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. मात्र, जखमी झालेल्यांपैकी तिघांचा आज मृत्यू झाला आहे.

delhi violence
दिल्ली हिंसाचाराची पाहणी करताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

By

Published : Feb 27, 2020, 10:50 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा कालपर्यंत २७ होता. मात्र, जखमी झालेल्यांपैकी तिघांचा आज मृत्यू झाला आहे. गुरु तेग बहादुर रुग्णालयाने याबाबत माहिती दिली आहे. मागील २४ तासात हिंसाचाराची एकही घटना घडली नाही.

तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सर्वात जास्त हिंसा सोमवारी आणि मंगळवारी झाली. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून आज कोठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. संवेदनशील भागांमध्ये पोलीस 'फ्लॅग मार्च' करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घरोघरी जाऊन नागिरकांना दिलासा देत आहेत. त्यामुळे लोकांमधील भीतीचे वातावरण कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बाबरपूर, मौजापूर, जाफराबाद येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कशी पसरली हिंसा?

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्लीमध्ये मागील ३ दिवस हिंसक आंदोलन पेटले होते. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेला दिल्लीत हिंसाचार पसरला होता. साध्या बाचाबाचीचे रुपांतर हिंसक आंदोलनात झाले. आंदोलकांनी घरे,दुकाने, गाड्या, सार्वजनिक मालमत्तेला आगी लावल्या, तसेच तोडफोडही केली.

अनियंत्रित नागरिकांचे टोळके काठ्या, दांडके घेवून रस्त्यावंरून फिरत होते. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आंदोलकांमना नियंत्रणात आणताताना एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दोनशेपेक्षा जास्त नागरिकही जखमी झाले आहेत. नागरिक भीतीने घरांमध्ये कड्या लावून बसले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात धुराचे लोट उठले होते. पोलिसांनी काही भागात एक महिन्यापर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

सरकारी यंत्रणांची हालचाल?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर दिल्लीची परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details