नवी दिल्ली -ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता ४८ वर गेली आहे. दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या १८ वर्षीय आकिब या तरुणाचा आज मृत्यू झाला.
२४ फेब्रुवारीला झाली होती जखम..

आकिबच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २४ फेब्रुवारीला हिंसाचारादरम्यान आकिबच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्यातील रक्त गोठले आहे, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा :हैदराबादमध्ये तीन कोरोना विषाणू संशयित; विशेष रुग्णालयाची स्थापना