नवी दिल्ली- ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त परिस्थिती चार दिवस होऊनही पोलिसांना आटोक्यात आणता आलेली नाही. याची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने देखील काल (बुधवारी) घेतली. त्यामुळे या हिंसाचाराबद्दल कॉंग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ सोनिया गांधीसह आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.
दिल्ली हिंसा: सोनिया गांधीसह काँग्रेसचे शिष्टमंडळ आज घेणार राष्ट्रपतींची भेट... - दिल्ली हिंसा
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विजय चौक ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढला जाणार आहे. यात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, पी.चिदंबरम, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल, आनंद शर्मा आणि अन्य प्रमुख नेतेही यात सहभागी होणार आहेत.
delhi-violence-congress-delegation-to-meet-president-kovind-today
हेही वाचा-एजीआर शुल्क : व्होडाफोन आयडियाने सरकारकडे 'या' केल्या मागण्या
यावेळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विजय चौक ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढला जाणार आहे. यात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, पी.चिदंबरम, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल, आनंद शर्मा आणि अन्य प्रमुख नेतेही यात सहभागी होणार आहेत.