महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi violence : ताहीर हुसेनची अखेर 'आप'मधून हकालपट्टी; हिंसाचार भडकवल्याचा आरोप - दिल्ली हिंसाचार

ताहीर यांच्यावर दयालपूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला तेव्हा आम आदमी पक्षाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

Tahir Hussain
ताहिर हुसेनची आपमधून हकालपट्टी

By

Published : Feb 28, 2020, 3:34 AM IST

Updated : Feb 28, 2020, 8:26 AM IST

नवी दिल्ली - आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर ईशान्य दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्याचा आरोप असून त्यांच्यावर दयालपूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाने ताहीर यांची सदस्यपदावरून हकालपट्टी केली आहे.

ताहीर हुसेन यांच्या घरावरून 25 फेब्रुवारीला दंगलखोरांनी दगडफेक केली होती, असा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच हुसेन यांच्या घराच्या छताचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, आणि मोठे दगड आढळून आले. पण, ताहीर हुसेन यांनी आरोपांचे खंडन केले आहे. हिंसाचारावेळी मी घरामध्ये उपस्थित नव्हतो, असे त्यांनी म्हटलं आहे.

गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येत ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताहीर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचे अंकित शर्मा यांच्या वडिलांनी म्हटले आहे. मात्र, ताहीर हुसेन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला बदनाम करण्यासाठी हा सर्व कट रचला असल्याचेही ते म्हणाले.

ताहीर यांच्यावर दयालपूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला तेव्हा आम आदमी पक्षाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीत जनजीवन पूर्व पदावर येत आहे. मागील 36 तासांत कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी 10 वाजेनंतर जमावबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे.

हेही वाचा -#दिल्ली हिंसाचार : आम आदमी पक्षाचा नेता दोषी आढळल्यास त्याला दोन वेळा शिक्षा द्या

हेही वाचा -दिल्ली हिंसाचार : आप नगरसेवकाच्या कारखान्याला पोलिसांनी ठोकले ताळे

Last Updated : Feb 28, 2020, 8:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details