नवी दिल्ली- १ मे हा जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. काही देशात हा दिवस 'मे दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी हा दिन पाळण्यात येतो. कामगार दिनानिमित्त दिल्ली विश्वविद्यालयातील तरुणांचे काय मत आहे? त्यांना कागार दिनाविषयी माहिती आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या दिल्ली येथील प्रतिनिधींनी केला. मात्र, ७० टक्के युवकांना कामगार दिन कधी असतो आणि का साजरा केला जातो याविषयी माहिती नसल्याचे उघड झाले आहे.
देशाचे भविष्य असलेले युवक डिजिटली सशक्त झाले आहेत. मात्र, बऱयाच युवकांना कामगार दिवस काय आहे हेच माहिती नाही. एकीकडे सरकारकडून कामगारांच्या विकासाची गोष्टी केल्या जात आहेत, त्यांना सशक्त करण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, भविष्यात जे विद्यार्थी कामगार, नोकरदार बनणार आहेत त्यांनाच कामगार दिनाविषयी माहिती नसणे ही गांभीर्याची गोष्ट आहे.