नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत आज (शनिवार) दिवसभरात कोरोनाचे 111 रुग्ण आढळून आले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 625 झाला आहे. तर आत्तापर्यंत 54 रुग्ण दगावले आहेत, दिल्ली सरकारने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
दिल्लीत दिवसभरात कोरोनाचे 111 रुग्ण; एकूण बाधित 2 हजार 625
मागील 24 तासांत देशात 1 हजार 490 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभरामध्ये आत्तापर्यंत 24 हजार 942 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी 18 हजार 953 अॅक्टिव्ह केसेस असून 5 हजार 210 रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
मागील 24 तासांत देशात 1 हजार 490 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात आज दिवसभरात 40 रुग्णांची नोंद झाली. तर महाराष्ट्रात 811 रुग्ण आढळून आले. दिल्ली सरकारने कोरोनाचा जास्त प्रभाव नसलेल्या भागांमध्ये दुकाने सुरू ठेवण्यावरील निर्बंध हटवले आहेत. दिल्लीमध्ये कंन्टेनमेंट झोनची संख्या 95 झाली आहे.