नवी दिल्ली : जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने आज देशाची राज्यनिहाय साक्षरता आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये नेहमीप्रमाणे केरळ राज्य आघाडीवर आहे. तर देशातील सर्वात कमी साक्षर राज्य आंध्र प्रदेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशचा साक्षरता दर हा चक्क बिहारपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात पहिल्या पाच साक्षर राज्यांमध्ये अनुक्रमे केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसामचा क्रमांक लागतो. साक्षरतेनुसार देशात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तर बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्ये सर्वात खाली असल्याची माहिती या अहवालात समजली आहे.