नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 'राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२०' च्या विजेत्या मुलांची भेट घेतली. 'इतक्या लहान वयात तुम्ही सर्वांनी दाखवलेले साहस अद्भुत असून त्यापासून मला प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही समाज आणि राष्ट्राप्रती जागरूक असल्याचे पाहून मला तुमचा अभिमान वाटतो', असे मोदी मुलांना संबोधित करताना म्हणाले.
हेही वाचा -"भारतीय अजूनही संविधानाबाबत अशिक्षित.."
गेल्या वर्षीपासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ पुरस्कार सुरू केला. सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, क्रीडा, कला व संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 49 बालकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व बालकांना यावर्षी राजपथवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.
हेही वाचा - पर्यावरण रक्षणासाठी रायचूर शहरात नलिनी वाटतात मोफत कापडी पिशव्या