महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिवाळीनंतर धुराने वेढली दिल्ली, प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर

रविवारी रात्री उडवण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे राजधानी दिल्लीसह सर्व मोठ्या शहरांमधील हवेतील प्रदूषकांचे प्रमाण गंभीर स्थितीपर्यंत वाढलेले आहे. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबाद येथेही प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर पोहोचल्याची नोंद झाली.

दिवाळीनंतर धुराने वेढली दिल्ली, प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर

By

Published : Oct 28, 2019, 12:02 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालय आणि एनजीटीच्या निर्देशांनुसार, दिवाळीच्या रात्री दिल्ली एनसीआरमध्ये जोरदार आतषबाजी झाली. याचा परिणाम म्हणून सोमवारी पहाटे धुराचे अत्यंत दाट धुके दिल्लीवर पसरले होते. सकाळी 8 वाजता दिल्लीचा हवेचा निर्देशांक (एअर इंडेक्स) 348 नोंदविण्यात आला. प्रदूषणाची ही स्थिती 'धोकादायक श्रेणी'तील समजली जाते.

रविवारी रात्री उडवण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे राजधानी दिल्लीसह सर्व मोठ्या शहरांमधील हवेतील प्रदूषकांचे प्रमाण गंभीर स्थितीपर्यंत वाढलेले आहे. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबाद येथेही प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर पोहोचल्याची नोंद झाली.

दिल्लीतील वाढते प्रदूषण पाहता, सर्वोच्च न्यायालय आणि एनजीटीने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला होता. काही निवडक दुकानांना 'ग्रीन क्रॅकर्स' विकण्याचे परवाने देण्यात आले होते. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून दिल्लीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. यामुळे दिल्लीतील अनेक भागांमध्ये प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर पोहोचले.

प्रदूषण निर्देशांक रात्री उशिरा 500 च्याही पुढे

दिल्लीतील अनेक ठिकाणी रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या जोरदार आतषबाजीमुळे एअर इंडेक्स 500 च्याही पुढे गेला. सोमवारी सकाळी हा काही प्रमाणात या निर्देशांकात घट झाल्यामुळे हवेचा दर्जा काहीसा सुधारला.

ABOUT THE AUTHOR

...view details