नवी दिल्ली -देशाच्या राजधानीत दिल्ली पोलिसांचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी एका अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
दिल्लीतील आर. के. पुरम पोलीस ठाण्यांर्तगत असलेल्या संगम सिनेमाजवळ ही घटना घडली आहे. तो अल्पवयीन मुलगा रात्री जेवण मागण्यासाठी रस्त्यावर फिरत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी हटकले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.