नवी दिल्ली-कोरोना विषाणूचा प्रसार दिल्ली शहरात वाढतच आहे. यामुळे मास्कची मागणी वाढली आहे हे लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस ड्युटी संपल्यानंतर मास्क बनवत आहेत. पोलीस दलातील ड्युटी संपल्यानंतर त्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्र येथे मास्क बनवतात. कोरोनाच्या लढ्यात दिल्ली महिला पोलिसांची कृती प्रेरणादायी आहे.पोलीस दलातील ड्युटी बजावल्यानंतर मास्क बनवणे ही महिला पोलिसांनी सुरु केल्याचे द्वारका येथील अतिरिक्त पोलीस उपायु्क्त आर.पी.मीना यांनी सांगितले.
प्रेरणादायी... दिल्लीच्या महिला पोलीस ड्युटी संपल्यानंतर बनवतायेत मास्क
जे मास्क खरेदी करु शकत नाहीत त्यांना आणि पोलिसांनाही मास्क देण्यात येतील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगतिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत घरच्या घरी मास्क बनवा या संकल्पनेतून हे मास्क बनवण्यात येत आहेत. हे मास्क धुवुन पुन्हा वापरता येतील. कोरोना विरुद्धच्या लढ्यात हे महत्तवाच योगदान असेल.
जे नागरिक मास्क खरेदी करु शकत नाहीत त्यांना आणि पोलिसांनाही मास्क देण्यात येतील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगतिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत घरच्या घरी मास्क बनवा या संकल्पनेतून हे मास्क बनवण्यात येत आहेत. हे मास्क धुवुन पुन्हा वापरता येतील. कोरोना विरुद्धच्या लढ्यात हे महत्तवाच योगदान असेल.
ज्या महिला पोलिस काँन्स्टेबल्सना शिलाई काम येत होते त्या कौशल्य विकास केंद्रात काम करत आहेत आणि इतर सहकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी महिला पोलीस करत असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत.