नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शाहीन बाग येथील आंदोलक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याच्या तयारीत होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना मोर्चा काढण्यापासून रोखले. आंदोलकांना मोर्चा काढण्याची परवानगी मिळालेली नाही, असे म्हणत पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.
अमित शाह यांच्या निवासस्थानी जाणास शाहीन बाग आंदोलकांना मज्जाव - अमित शाह बातमी
चार ते पाच हजार आंदोलक अमित शाह यांच्या घरी मोर्चा नेण्याच्या तयारीत होते. आंदोलकांना मोर्चा काढण्याची परवानगी मिळालेली नाही, असे म्हणत पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.
चार ते पाच हजार आंदोलक अमित शाह यांच्या घरी मोर्चा नेण्याच्या तयारीत होते. आंदोलकांचे किती प्रतिनिधी अमित शाह यांना भेटण्यास जाणार आहेत? याची माहिती पोलिसांनी मागितली होती. मात्र, सर्व आंदोलक शाह यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली. ४ ते ५ हजार आंदोलन अमित शाह यांच्या निवासस्थानाकडे निघाले असता, पोलिसांनी त्यांना अडवले.
सीएएला विरोध करणाऱ्यांबरोबर चर्चा करायला तयार असल्याचे अमित शाह यांनी गुरुवारी वक्तव्य केले होते. शाहीन बाग येथील आंदोलकांशी बोलण्याची तयारी शाह यांनी दर्शवली होती. यासाठी त्यांनी तीन दिवसांची वेळ दिली होती. मात्र, चर्चा कायद्याच्या चौकटीत राहून करायला तयार असल्याचे मोदी म्हणाले.