नवी दिल्ली- निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाचा गोळ्या घालून खुन केल्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्लीमधील रोहिणी अमन विहारमध्ये गुरुवारी घडली आहे. नितीन दलाल असे मृताचे नाव आहे.
निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाचा गोळ्या घालून खून - Latest National capital crime news
आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. नितीन हे भावाची कार चालवित होते. त्यामुळे चुकीने त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
![निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाचा गोळ्या घालून खून नितीन दलाल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11:55:10:1593757510-7870481-asi.jpg)
नितीन दलाल यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. अज्ञात व्यक्तींनी नितीन यांचा गोळ्या घालून खून केला. नितीन हे त्यांच्या भावाची कार चालवित होते. त्यावेळी सँट्रोमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. नितीन यांचे भाऊ स्थावर मालमत्ता व्यवसायात आहेत. आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. नितीन हे भावाची कार चालवत असताना चुकीने त्यांचा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. आरोपीला अटक केल्यानंतर खूनामागील खरे कारण कळू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके नेमली आहेत. गुन्हा घडलेल्या घटनास्थळानजीकच्या सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंगची पोलिसांकडून पाहणी केली जात आहे.