नवी दिल्ली - जेएनयू कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात दिल्ली पोलिसात शुक्रवारी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी आज( 10 जानेवारी) या घटनेतील संशयितांचे काही फोटो जारी केले आहेत. हिंसाचाराप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसून लवकरच संशयितांची चौकशी केली जाईल असे, तिर्की यांनी स्पष्ट केले आहे.
जेएनयू हिंसाचार : पोलिसांकडून संशयितांचे फोटो जारी; संशयितांमध्ये आयेशी घोषचाही समावेश - जेएनयू हिंसाचार प्रकरण संशयित
5 जानेवारी चेहरे झाकून काही हल्लेखोरांनी जेएनयू परिसरात घुसून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मारहाण केली होती. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणी पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी आज( 10 जानेवारी) या घटनेतील संशयितांचे काही फोटो जारी केले आहेत. हिंसाचाराप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसून लवकरच संशयितांची चौकशी केली जाईल असे, तिर्की यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -Jamia CAA protest: आधी घोषणांनी रस्ते रंगवले, आता विद्यापीठातच 'डिटेन्शन सेंटर' बनवलं
5 जानेवारीला चेहरे झाकून काही हल्लेखोरांनी जेएनयू परिसरात घुसून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मारहाण केली होती. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. चंचुन कुमार, पंकज मिश्रा, आयेशी घोष (जेएनयूएसयू अध्यक्ष), वास्कर विजय, सुचेता तालुकाराज, प्रिया रंजन, डोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा संशयितांमध्ये समावेश असल्याचे, जॉय तिर्की यांनी सांगितले आहे. याप्रकरणी, आतापर्यंत एकूण 14 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी, एक तक्रार शिक्षकाने केली आहे. तर बाकी सर्व तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.