नवी दिल्ली -दिल्ली पोलिसांच्या पीसीआर मोबाईल पेट्रोलिंग टीमने सतर्कता दाखवत आत्महत्या करण्यास जाणाऱ्या गर्भवती महिलेचा जीव वाचविला. ही घटना ईस्ट रोहतास नगर
मध्ये घडली.
पीसीआर डीसीपी शरत कुमार सिन्हा यांनी दिलेली माहिती अशी, की ईस्ट रोहतास नगरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या एएसआई तेज सिंह, हवालदार पुष्पेंद्र आणि हरेंद्र यांच्या टीमला एक पीसीआर कॉल मिळाला. एक गर्भवती महिलेचे सासरच्या लोकांसोबत भांडण झाले होते. यामुळे कारण ती घरातच फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे.