नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील हिंसाचार ग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे. पोलीस सह आयुक्त ओ. पी. मिश्रा यांनी फ्लॅग मार्च करताना नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
दिल्ली हिंसाचार: 'दुकाने उघडा.. घराबाहेर पडा! घाबरण्याचे कारण नाही, पोलीस आयुक्तांचे आवाहन - दिल्ली जाळपोळ
'किराणा, मेडिकल आणि इतर वस्तूंची दुकाने उघडू शकता. भीती बाळगण्याची गरज नाही. पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दैनदिन कामासाठी बाहेर येऊ शकता, फक्त नागरिकांनी विशेषता तरुणांनी टोळक्याने जमा होऊ नका, असे आवाहन पोलीस आयुक्त मिश्रा यांनी केले.

गरज पडल्यास पोलिसांशी चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. मागील २४ तासांत ईशान्य दिल्लीतील संवेदनशील भागात एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. मात्र, आत्तापर्यंत ३३ जणांचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. आज सकाळी २ जणांचे मृतदेह गोकुळपुरी येथील नाल्यात आढळून आले. तर लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.