नवी दिल्ली - दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आंदोलन सुरू आहे. या परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहीन बाग परिसर खाली करण्याचे वक्तव्य हिंदू सेनेने शनिवारी केले होते. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विवादित नारगरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. या धरणे आंदोलनामुळे नोएडा आणि फरिदाबादकडे जाणारे मार्गही बंद झाले आहेत.