नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. दरम्यान याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिने कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
LIVE : जेएनयू हिंसाचार प्रकरण : 'हिंदू रक्षा दल' ने स्वीकारली जबाबदारी ; कोलकात्यात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज - जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ कोलकात्यातील सुलेखा मोरजवळ निदर्शने करणाऱ्या जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. स्टूडंट युनियन (जेएनयूएसयू) अध्यक्ष आयेशा घोषने कालचा हल्ला आरएसएस आणि अभाविपच्या गुंडांचा संघटित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. आरएसएसशी संबंधित काही प्राध्यापक आणि अभाविप मागील 4-5 दिवसांपासून कॅम्पसमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचेही तिने म्हटले आहे.
जेएनयू हिंसाचार प्रकरण
मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही माहिती मिळवत आहोत. दरम्यान रुग्णालयात दाखल २३ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती डीसीपी देवेंद्र आर्या यांनी दिली आहे.
LIVE UPDATES -
- 10. 30 PM - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने मुलांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. भूपेंद्र चौधरी याने दावा केला आहे की, जेएनयूमध्ये शिकणारी मुले देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी आहेत. काही दिवसांपासून ते जास्त वेगाने काम करत आहेत. त्यामुळे दवलाच्या कार्यकर्त्यांना हे पाऊल उचलावे लागले. यापुढेही ते असे हल्ले करत राहणार असल्याची धमकीही त्याने दिली आहे.
- 9.43 PM - मुंबई - अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, तापसी पन्नू, जोया अख्तर, दिया मिर्झा, राहुल बोस यांनी कार्टर रोड येथे झालेल्या निषेध मोर्चात भाग घेतला.
- 8.40 PM - नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या हिंसाचाराविरोधात युवक काँग्रेसच्या सदस्यांनी इंडिया गेट येथे टॉर्च रॅली काढली.8.30 PM - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पोलीस तैनात.
- 8.10 PM - जेएनयू हल्ल्याविरोधात चेन्नईत विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला.
- 8.00 PM जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ कोलकात्यातील सुलेखा मोरजवळ निदर्शने करणाऱ्या जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
- 5.41 PM - स्टूडंट युनियन (जेएनयूएसयू) अध्यक्ष आयेशा घोष हिने कालचा हल्ला आरएसएस आणि अभाविपच्या गुंडांचा संघटित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. आरएसएसशी संबंधित काही प्राध्यापक आणि एबीव्हीपी मागील 4-5 दिवसांपासून कॅम्पसमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचेही तिने म्हटले आहे.
- 4:22 PM - अकोला - जेएनयूतील घटनेचे पडसाद अकोल्यात उमटले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांची निदर्शने.
- 3:26 PM - विना सरकारी सुरक्षेशिवाय जेएनयूची घटना घडूच शकत नाही. अर्थव्यवस्था, बेरोजगारी यावरून लक्ष हटवण्यासाठी जेएनयू हल्ला करण्यात आला असल्याचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा आरोप.
- 02.43 PM - जितेंद्र आव्हाडांनी आंदोलनात सहभागी होऊन केला केंद्र सरकारचा जाहीर निषेध
- 2:41 PM - अकोला - जेएनयू विद्यापीठातील प्रकरणाची मानव संसाधन विभागाच्या सचिवांनी दखल घेतल्याची केंद्रीय मंत्री धोत्रे याची माहिती.
- 1:29 PM - जेएनयूत डाव्या विचाराचा गुंडांकडून अहिंसा करण्यात आल्याचा अभाविप आणि मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांचा आरोप. रुईया कॉलेज, माटुंगा येथे विद्यार्थ्यांची निदर्शने.
- 01.06 PM - जेएनयूमधील हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित - शरद पवार
- 12.26 PM - तुम्ही चुकीचं काम करत होता, म्हणून चेहरा झाकून आलात - रितेश देशमुख
- 11.53 AM - साबरमती वसतिगृहाच्या वॉर्डनचा राजीनामा
- 11.49 AM - तातडीने त्या गुंडांवर कारवाई व्हावी - आदित्य ठाकरे
- 11.39 AM - हल्लेखोरांविरोधात कारवाई झाली पाहिजे - पार्थ पवार
- 11.38 AM - पोलीस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत
- 11.38 AM - विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही - स्मृती इराणी
- 11.05 AM - जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Last Updated : Jan 6, 2020, 10:54 PM IST