नवी दिल्ली - जामिया परिसर आणि न्यू फ्रेंड्स कॉलीनीत १५ डिसेंबरला झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे. तसेच १०० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या शरजील इमामचे नावही चार्जशिटमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जामिया हिंसाचार: दिल्ली पोलिसांकडून चार्जशिट दाखल; शरजील इमामचाही समावेश - सीएए जामिया हिंसाचार
जामिया परिसर आणि न्यू फ्रेंड्स कॉलीनीत १५ डिसेंबरला झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे.
![जामिया हिंसाचार: दिल्ली पोलिसांकडून चार्जशिट दाखल; शरजील इमामचाही समावेश सीएए जामीया हिंसाचार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6113217-730-6113217-1582013835815.jpg)
सीएए जामीया हिंसाचार
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात १५ डिसेंबरला या दोन ठिकाणी हिंसाचार झाला होता. घटनास्थळी रिकामी काडतूसे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याचे नाव नाही. न्यू फ्रेड्ंस कॉलीनी येथून नऊ आणि जामिया परिसरातून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या सहभागाबद्दल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.