महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शरजील इमामने सीएए-एनआरसी बद्दल दिशाभूल करणारे पत्रक वाटली - Delhi Police Crime Branch on Sharjeel

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला जेएनयू विद्यार्थी शरजील इमाम यांने दिशाभूल करणारे आणि तथ्य नसलेले सीएए-एनआरसीविरोधी पत्रक तयार करून वेगवेगळ्या मशिदींमध्ये वितरीत केले होते,अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

शरजील इमाम
शरजील इमाम

By

Published : Jan 31, 2020, 11:39 PM IST

नवी दिल्ली - देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला जेएनयू विद्यार्थी शरजील इमाम यांने दिशाभूल करणारे आणि तथ्य नसलेले सीएए-एनआरसीविरोधी पत्रक तयार करून वेगवेगळ्या मशिदींमध्ये वितरीत केले होते,अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्लीच्या वसंत कुंजमध्ये भाड्याने घेतलेल्या शरजील इमामच्या घरातून दिल्ली पोलीस गुन्हे शाखेने 1 लॅपटॉप आणि 1 डेस्कटॉप संगणक जप्त केला आहे. तसेच त्याचा मोबाईल फोन बिहारच्या जहानाबाद येथील त्यांच्या घरून जप्त केला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहास विभागाचा विद्यावाचस्पती अभ्यासक असणाऱ्या शेरजीलला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनांमध्ये त्याने केलेली प्रक्षोभक भाषणे सोशल मीडियावर पसरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.डिसेंबर महिन्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पूर्वेकडील राज्यांना जोडणारा भाग असलेल्या 'चिकन्स नेक' (चिंचोळा भूप्रदेश) येथे चक्का जाम करुन आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details