नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यानी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुड्डु असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बिहारच्या बक्सार येथील तो रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज तिवारींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक - BJP MP
मनोज यांना मोबाईलवरील संदेशामार्फत जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे मनोज यांनी तात्काळ पोलिसात तक्रार नोंदविली होती.
मनोज यांना गुड्डुकडुन मोबाईलवर संदेशामार्फत जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे मनोज यांनी तात्काळ पोलिसात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनीदेखील याची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर त्यांनी २५ वर्षीय गुड्डुला अटक केली आहे.
प्रसिद्धीसाठी गुड्डुने मनोज यांना धमकी दिली, असे त्याने सांगितले आहे. मात्र, त्याने कोणाच्या सांगण्यावरुन मनोज तिवारींना संदेश पाठवला होता. त्याचा नेमका हेतु काय होता, याचा तपास दिल्ली पोलीस घेत आहे.