नवी दिल्ली - लॉकडाऊनदरम्यान दिल्लीत एका जोडप्याने लग्नगाठ बांधली आहे. यात विशेष बाब अशी, की या विवाहासाठी दोन्ही कुटुंबांची दिल्ली पोलिसांनी मदत केली. शाहदरा जिल्ह्याच्या गांधीनगर उपविभागाचे एसीपी सिद्धार्थ जैन यांनी या जोडप्याला आर्थिक मदतदेखील केली.
खाकीतील माणुसकी: लॉकडाऊनमुळे वाहने बंद, पोलिसाने नवरदेवाला पोहोचवले मंडपात - लॉकडाऊनमुळे वाहने बंद
एसीपी सिद्धार्थ जैन यांना स्थानिक आरडब्ल्यूएकडून एक फोन आला. यावेळी त्यांना सांगितले गेले, की कैलास नगरमधील एका हिमांशू नावाच्या मुलाचे लग्न आहे. लग्नासाठी त्याला न्यू उस्मानपूर येथे जायचे आहे. मात्र, यासाठी वाहन उपलब्ध नाही. अशात सिद्धार्थ जैन या कुटुंबाच्या मदतीला आले.
एसीपी सिद्धार्थ जैन यांना स्थानिक आरडब्ल्यूएकडून एक फोन आला. यावेळी त्यांना सांगितले गेले, की कैलास नगरमधील एका हिमांशू नावाच्या मुलाचे लग्न आहे. लग्नासाठी त्याला न्यू उस्मानपूर येथे जायचे आहे. मात्र, यासाठी वाहन उपलब्ध नाही. अशात सिद्धार्थ जैन या कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले.
सिद्धार्थ जैन यांनी लग्नात सहभागी होणाऱ्या 4 सदस्यांना सोशल डिस्टन्सिंची काळजी घेत विवाहस्थळी पोहोचवले. यासोबतच लग्नानंतर नवरीची पाठवणीदेखील केली. नवरा नवरीला आर्शिवाद देताना त्यांनी दोघांना आर्थिक मदतही केली आहे. यानंतर दोन्ही कुटुबांनी जैन यांचे आभार मानले.