महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांना 'ऑड-इव्हन' मधून सूट

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर येत आहे. यामुळे या वाहनांना ऑड-इव्हन नियमातून सूट देण्यात आली आहे. सध्या दिल्लीमध्ये १ हजारांहूनही कमी नोंदणीकृत वैयक्तिक इलेक्ट्रिकल कार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना 'ऑड-इव्हन' मधून सूट

By

Published : Nov 4, 2019, 12:24 PM IST

नवी दिल्ली -दिल्लीमध्ये वातावरणातील वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने गाड्यांची ऑड-इव्हन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी भयावह स्थितीत पोहोचली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, या नियमातून इलेक्ट्रिक वाहनांना सूट देण्यात आली आहे.

'सम' तारखेला 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील तर, 'विषम' तारखेला 'विषम' क्रमांकाच्या गाड्या धावतील. आजपासून ही प्रणाली लागू झाली असून आज ४ तारीख असल्याने 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी राहील. १५ नोव्हेंबरपर्यंत 'ऑड-इव्हन'चा नियम सुरू राहणार आहे. केवळ रविवारचा याला अपवाद राहणार आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर येत आहे. यामुळे या वाहनांना ऑड-इव्हन नियमातून सूट देण्यात आली आहे. सध्या दिल्लीमध्ये १ हजारांहूनही कमी नोंदणीकृत वैयक्तिक इलेक्ट्रिकल कार आहेत. या सर्व गाड्यांचा या नियमात समावेश करण्यात आलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details