नवी दिल्ली -केजरीवाल सरकारने तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यातच आता दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनने १८ मे पासून सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. तिसरा लॉकडाऊन संपल्यानंतर ५५ दिवस बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा नव्याने सुरु होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत १८ मे पासून मेट्रो सुरू होण्याची शक्यता; प्रशासनाकडून सॅनिटायझेशन सुूरू - दिल्ली मेट्रो
खास प्रशिक्षण दिलेले सफाई कर्मचारी मेट्रो स्टेशन स्वच्छ करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. प्रवेश गेट, लिफ्ट आणि स्टेशमधील परिसर स्वच्छ करण्यात येत आहे.
खास प्रशिक्षण दिलेले सफाई कर्मचारी मेट्रो स्टेशन स्वच्छ करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. प्रवेश गेट, लिफ्ट आणि स्टेशमधील परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. असे ट्विट मेट्रो प्रशासनाने सोमवारी केले आहे. जेव्हा ईटीव्ही भारतने मेट्रो स्टेशनवर चौकशी केली तेव्ही २०० पेक्षा जास्त कर्मचारी विविध स्टेशनवर कामासाठी आल्याची माहिती मिळाली. प्रत्येक स्टेशन स्वच्छ करण्याचा प्रयत्न मेट्रो प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण घेत मेट्रो सेवा सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये आत्तापर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांपेकी २ हजार १२९ रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत.