नवी दिल्ली- पत्नीशी झालेल्या भांडणांवेळी राग अनावर झाल्याने पतीने तिची हत्या केल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. पती आणि पत्नी या दोघांनाही दुसरा विवाह केला होता. दोघांना मिळून 9 मुले होती. ही घटना मदिपूर जे.जे. कॉलनी मध्ये घडली आहे. हा परिसर कटेंन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा करताना झालेल्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या - गुलशन
मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा सुरु असताना भांडण झाल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात काठीने मारहाण करत तिची हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पतीला अटक केली आहे.
![मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा करताना झालेल्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या delhi-man-kills-wife-over-argument-about-childrens-future](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6933682-640-6933682-1587803806368.jpg)
शनिवारी पहाटे 3.30 वाजता पोलिसांना पती- पत्नीमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना महिला मृत अवस्थेत आढळून आली. 34 वर्षीय रईसुल आझम फळ विक्रेत्याने त्याच्या पेक्षा पाच वर्षांनी मोठी असणाऱ्या गुलशन हिच्याशी एका महिन्यापूर्वी लग्न केले होते. आझम याला पहिल्या पत्नीपासून 3 मुले तर गुलशनला पहिल्या पतीपासून 6 मुले होती.
आझम आणि गुलशन मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा करत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन जोरदार भांडणात झाले. आझमने रागाच्या भरात गुलशनच्या डोक्यात काठीने मारहाण केली यात गुलशनचा मृत्यू झाला. आझम याने स्वत: या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आझमला अटक केली असून घटनेचा तपास सुरु आहे.