नवी दिल्ली - दिल्लीच्या गौतमनगरमध्ये महिला डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या दोनही डॉक्टर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात कार्यरत आहेत.
बुधवारी रात्री या दोन डॉक्टर गौतमनगर परिसरातील एका दुकानातून किराणा सामान घेत होत्या. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना हटकले आणि त्या दोघी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. तुमच्यामुळे कोरोना विषाणू पसरत आहे, असे म्हणत त्या व्यक्तीने या महिलांना थप्पडही मारली. परिसरातील लोकांनी यामध्ये हस्तक्षेप करताच तो व्यक्ती तिथून पळून गेला.