नवी दिल्ली - केंद्र सरकारने लॉक डाऊनच्या तिसऱ्या करण्याची घोषणा केली आहे. अशात केजरीवाल सरकारने याआधी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल होत असल्याचे दिसत आहे. त्यांनी सर्व गरीब आणि गरजूंना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
दिल्लीत रोजंदारी मजूर सरकारी मदतीपासून वंचित, ठेकेदारांकडे उधारी करून चालवताहेत कुटुंब दक्षिण दिल्लीतील सतबडी येथे जवळपास दोनशे रोजंदारी करणारे मजूर अडकलेले आहेत. या मजुरांना सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. हे लोक ठेकेदाराकडून कर्ज घेऊन आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा निर्वाह कसाबसा चालवत आहेत.
दिल्लीत रोजंदारी मजूर सरकारी मदतीपासून वंचित मजुरांनी ऐकवली त्यांची दुःखद कहाणी
छत्तरपूर क्षेत्रातील सतबडी येथे विविध राज्यांतून आलेले जवळपास 200 रोजंदारी करणारे मजूर आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी त्यांची दुःखद कहाणी सांगितली आहे. लॉकडाऊनमुळे हे मजूर येथे अडकले आहेत. या लोकांनी आपल्याला गावी जाणे शक्य झालेले नाही. तसेच, दुसर्या बाजूला खाण्यापिण्याची कोणतीच व्यवस्था उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.
सध्या नाईलाजास्तव या मजुरांना त्यांच्या ठेकेदारांकडून उधार पैसे घेऊन आपला निर्वाह चालवावा लागत आहे. ठेकेदार सध्या तरी त्यांना थोडेफार धान्य आणि इतर गरजेच्या वस्तू देत आहेत. मात्र, नंतर ते सर्वांकडून त्याची वसुलीही करतील असे या मजुरांनी सांगितले. या मजुरांना अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही. ती लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.