दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठ प्रशासनाविरोधात मोर्चा काढला. विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ, ड्रेस कोड, कर्फ्यूची वेळ आदी नियम मागे घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे. आज विद्यापीठात दीक्षांत समारोह सुरू आहे. त्या दरम्यान, शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसराच्या बाहेर निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली.
शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांसोबत विद्यार्थ्यांची झटापट - agitation
विद्यापीठाच्या दीक्षांत समोरहाचा सोहळा सुरू आहे. यासाठी कुलपती आणि उप राष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू उपस्थित आहेत. आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना दीक्षांत समारोहाप्रसंग आंदोलन केले. दोन आठवड्यापासून जेएनयूच्या विद्यार्थी संसदेकडून यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी एका आंदोलक विद्यार्थी म्हणाला, गेल्या १५ दिवसांपासून आम्ही मागण्या करत आहोत. पण, कुलगुरू आमच्याशी बोलणी करण्यास तयार नाहीत. विद्यापीठातील शुल्क प्रचंड वाढवण्यात आले आहे. ४० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी गरीब आर्थिक परिस्थितीतून येतात. त्यामुळे, त्यांना शिक्षण घेणे कठीण होईल.
विद्यापीठाच्या दीक्षांत समोरहाचा सोहळा सुरू आहे. यासाठी कुलपती आणि उप राष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू उपस्थित आहेत. आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना दीक्षांत समारोहाप्रसंग आंदोलन केले. दोन आठवड्यापासून जेएनयूच्या विद्यार्थी संसदेकडून यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करुन विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळावरुन मागे रेटले. महिला पोलिसांकडूनही विद्यार्थीनींवर बळाचा वापर करण्यात आला. यावेळी विद्यर्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.