नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणाचा निकाल देताना महिलेला तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. यातील महिलेचे पहिले लग्न प्रेम सबंधातुन झाले होते. मात्र महिलेच्या घरच्यांनी हे लग्न नाकारुन तिचे दुसरे लग्न केले होते. जस्टिस मनमोहोन आणि जस्टिस संगीता धींगरा सहगल यांच्या बेंचने यावर निकाल दिला. सोबत महिला आणि तिच्या नवऱ्याला सुरक्षा देण्याच्या सुचना दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत.
दिल्ली न्यायालयाच्या निकालाने महिलेला मिळाला पहिला पती, आई-वडिलांनी लावले होते दुसरे लग्न - jugment
दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणात निकाल देताना महीलेला तिच्या पहिल्या नवऱयासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. यातील महिलेचे पहिले लग्न प्रेम सबंधातुन झाले होते.
नेमके प्रकरण काय आहे-
सदरील महिलेचे याच वर्षी जुन महिन्यात दुसऱ्या धर्मातील युवकाशी लग्न झाले होते. मात्र तिच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी तिचे दुसरे लग्न केले. मात्र महिलेच्या पहिल्या नवऱ्यावने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यावर महिलेला न्यायालयात बोलावण्यात आले. त्यावेळी महिलेनेही पहिल्या नवऱ्यासोबत राहण्यास संमती दर्शवली.
न्यायालयाचा निर्णय-
महिला तिच्या मर्जीनुसार कोणासोबतही राहू शकते असे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर महिलेच्या आई-वडिलांनी महिलेच्या पहिल्या नवऱ्याला त्रास देणार नसल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना संबधित दाम्पत्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे.